Teacher Dance: ‘वाका वाका’ गाण्यावर शिक्षिकेचा भन्नाट डान्स, असा डान्स पाहिला नसेल

Teacher Dance: हल्ली समाजमाध्यमांवर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे वर्गातील काही क्षण अनेकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. सध्या असाच एक शाळेतील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये एक शिक्षिका आपल्या विद्यार्थिनींबरोबर आनंदाने डान्स करताना दिसत आहे.

आजच्या शालेय शिक्षणपद्धतीत आणि पूर्वीच्या शिक्षणपद्धतीत मोठा बदल झालेला पाहायला मिळतो. पूर्वी शिस्त आणि अभ्यास यांनाच अधिक महत्त्व दिलं जात होतं, तर आजच्या काळात विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी, कला आणि छंद यांनाही तितकंच महत्त्व दिलं जात आहे. त्यामुळे शिक्षकही विद्यार्थ्यांशी अधिक मैत्रीपूर्ण पद्धतीने संवाद साधताना दिसतात. (Teacher Dance)

या व्हायरल व्हिडीओमध्ये एका शाळेतील शिक्षिका आपल्या विद्यार्थिनींबरोबर दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध गायिका शकीराच्या ‘वाका वाका’ या गाण्यावर डान्स करताना दिसते. तिच्यासोबत विद्यार्थिनीही उत्साहाने नाचत असून, संपूर्ण वातावरण आनंदी आणि सकारात्मक असल्याचं दिसून येतं. शिक्षणासोबतच कला आणि आनंद यांचा सुंदर मिलाफ या व्हिडीओत पाहायला मिळतो.(Teacher Dance)

खालील व्हिडिओ वर क्लिक करून व्हिडिओ पहा

 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंत केला जात असून, अनेकांनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.(Teacher Dance) अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचं शिक्षण महत्त्वाचं असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

Leave a Comment