Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

Namo Shetkari Yojana: नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार; लाभार्थ्यांची संख्या घटली

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कृषी विभागानुसार योजनेतून लाभार्थी वगळण्याचे प्रमाण वाढले असून त्याचा परिणाम हप्ता मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या एकूण संख्येवर होत आहे.

याआधी २० वा हप्ता सुमारे ९६ लाख शेतकऱ्यांना मिळाला होता. मात्र, 21 व्या हप्त्यात लाभार्थ्यांची संख्या घटून ९२ ते ९३ लाखांवर आली. आता उपलब्ध माहितीनुसार नमो योजनेचा आठवा हप्ता एकूण ९० लाख ४१ हजार २४१ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.


शेतकरी वगळले जाण्यामागील कारणे Namo Shetkari Yojana

सरकारने लागू केलेल्या नवीन निकषांमुळे अनेक शेतकरी पात्रतेबाहेर गेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने खालील गटांचा समावेश आहे:

  • मृत लाभार्थी – सुमारे 28 हजार
  • दुहेरी लाभार्थी – सुमारे 35 हजार
  • एकाच रेशन कार्डावर असलेल्या कुटुंबातील फक्त एकालाच लाभ
    • यामुळे नवरा-बायको दोघांना लाभ मिळत असल्यास एक व्यक्ती वगळली जात आहे.

तसेच,

  • आयटीआर भरलेले लाभार्थी,
  • सेवा क्षेत्रातील (Service Sector) काम करणारे लाभार्थी,

यांच्या पात्रतेची काटेकोर पडताळणी केली जात आहे. त्यामुळे योजनेतून लाभार्थ्यांची संख्या पुढेही कमी होण्याची शक्यता आहे.


नमोचा आठवा हप्ता कधी जमा होणार?

शेतकऱ्यांमध्ये आठव्या हप्त्याच्या तारखेबाबत उत्सुकता आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा विचार करता, हा हप्ता डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.Namo Shetkari Yojana

Leave a Comment