12th Hall Ticket Download: 12वी बोर्ड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट अशा पद्धतीने करा डाउनलोड

12th Hall Ticket Download: बारावी हॉल तिकीट 2026: 10 जानेवारीपासून डाउनलोडसाठी उपलब्ध

विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे बारावी. बारावीच्या परीक्षांमुळेच विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शिक्षण आणि करिअरची दिशा ठरते. फेब्रुवारी–मार्च 2026 मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

यांच्या वतीने बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) 10 जानेवारी 2026 पासून अधिकृतपणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

हॉल तिकीट कुठे डाउनलोड करता येईल?

विद्यार्थ्यांना आपले हॉल तिकीट www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे.

हॉल तिकीट डाउनलोड करण्याची पद्धत 12th Hall Ticket Download

  1. mahahsscboard.in वेबसाइटला भेट द्या
  2. लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा
  3. Paid Status – Admit Card या पर्यायावर क्लिक करा
  4. आवश्यक माहिती भरून हॉल तिकीट डाउनलोड करा
  5. हॉल तिकीटाची प्रिंट काढून शाळा/महाविद्यालयाकडून प्रमाणित करून घ्या

महत्त्वाची सूचना 12th Hall Ticket Download

हॉल तिकीटामध्ये नाव, विषय, परीक्षा केंद्र यामध्ये काही त्रुटी आढळल्यास तात्काळ शाळेच्या प्राचार्यांशी संपर्क साधावा. तांत्रिक अडचणी असल्यास संबंधित विभागीय मंडळाकडे शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment